अलिबागचा 96.81 टक्के निकाल

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत अलिबाग तालुक्याचा 96.81 टक्के निकाल लागला आहे.

अलिबाग तालुक्यातून दोन हजार 698 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यामध्ये दोन हजार 612 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. मुलींनी 98.74 टक्के व मुलांनी 94.85 टक्के गूण मिळविले आहेत. मुलींनी या परीक्षेत चांगली बाजी मारली आहे.

निकालाची तारीख जाहीर झाल्यापासून 27 मे रोजी दुपारचे एक कधी वाजतात, याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले होते. निकाल पहाण्यासाठी सर्वांची लगबग सुरु होती. उतीर्ण झाल्याचे समजताच पालकांसह विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. काही विद्यार्थ्यांना 80 टक्के पेक्षा अधिक गूण मिळवून देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. 90 टक्के पेक्षा अधिक टक्के गुण मिळण्याची अपेक्षा या विद्यार्थ्यांना होती. काही विद्यार्थी कोणताही क्लास न लावता चांगल्या गुणांना उतीर्ण झाले. तर काही विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवणीतून उत्तम गुण मिळवून या परीक्षेत यश मिळविले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षात केला जात आहे.

Exit mobile version