महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे बॉब कॅट मशीन सुपूर्द; जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची उपस्थिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बॉब कॅट हे बीच क्लिनिंग मशीन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत अलिबाग नगरपरिषदेला सुपूर्द करण्यात आले.
या मशीनमुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी मदत होणार आहे. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी मेहेत्रे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी पोशेट्टी, तहसिलदार विशाल दौंडकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी वि.वि.किल्लेदार, क्षेत्र अधिकारी योगेश देशमुख व अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, दीक्षा शिरसाठ, इंजिनिअर उपस्थित होते. हे मशीन सध्या अलिबाग नगरपरिषदेमार्फत वापरले जाणार आहे.