। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी (दि.20) सायंकाळपासून शुक्रवारपर्यंत बंद राहणार आहे. एमआयडीसी मुख्य जलवाहिच्या दुरुस्तीचे काम निघाल्याने हा पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी (दि.22) व रविवारी (दि.23) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. अपव्यय करु नये, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.