| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग नजीकच्या वरसोली येथील ‘बे विस्टा’ सोसायटी मधील ‘बी’ विंग मधील तिसऱ्या मजल्यावर एसीच्या शॉर्टसर्किटमुळे रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. घडलेल्या घटनेत जीवितहानी झाली नसलीतरी वित्तहानी झाली आहे.
ब्लॉकला लावलेल्या एसी मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे निष्पन्न झाले. आग लागल्याची माहिती अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांना समजली. प्रसंगावधान राखून अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी तातडीने अग्निशमन दलाला आपत्ती निवारण यंत्रणेला पाचारण करून तातडीने आग विझवली. अग्निशमन दलाने ही आग विझवली यामुळे मोठी दुर्घटना टळली. आग लागलेल्या फ्लॅटमधील रहिवासी सुखरूप असून फ्लॅटचे आगीत नुकसान झाले असल्याचे प्रशासनाने सांगितले.