अलिबाग पासपोर्ट कार्यालय आता नजरेच्या टप्प्यात

आ.जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील जिल्हा टपाल अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीमध्ये पासपोर्ट कार्यालय उभारणीचे काम गेल्या सहा महिन्याच्यापासून सुरु आहे. बांधकामांचे काम पुर्ण झाले असून टॉवरपासून विद्युतीकरण व फर्निचर बसविण्याचे काम सुुरू असून आठवड्याभरात हे काम पूर्ण होऊन 31 जुलैैपर्यंत पासपोर्ट कार्यालय सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अलिबागकरांचे पासपोर्टचे स्वप्न लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील असंख्य नागरिक व विद्यार्थ्यांना त्यांच्या नोकरी व्यवसायाबरोबरच शिक्षणासाठी परदेशवारीला जाण्याची संधी मिळत असते. पासपोर्ट मिळविण्यासाठी ठाणे जिल्ह्यात रायगडकरांना फेर्‍या माराव्या लागतात. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पोलीस चौकशीनंतर ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात पडताळणीसाठी बोलावले जाते. त्यानंतर काही दिवसांनी घरपोच पासपोर्ट पाठविले जाते. त्यात काही त्रुटी निर्माण झाल्यास ठाणे कार्यालयात सतत फेर्‍या माराव्या लागतत. रायगडकरांची ही धावपळ थांबावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून अलिबागमध्ये पासपोर्ट कार्यालय असावे अशी मागणी नागरिकांची होती.

यासाठी शेकापचे केला होता. या मागणीला हिरवा कंदील मिळाला. अलिबागमधील जिल्हा डाक कार्यालयाच्या इमारतीलगतच तळ मजल्यावर हे कार्यालय सुरु करण्याचे नियोजनही झाले. गेल्या सहा महिन्यांपासून या कार्यालयाचे कामकाज सुरु होते. अखेर या कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. अलिबागमध्ये सुरु होणार्‍या पासपोर्ट कार्यालयामुळे अलिबागकरांसह संपुर्ण रायगडकरांची धावपळ थांबणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणीच पासपोर्ट मिळणार असल्याने वेळ व पैशाची बचत होण्यास मदत होणार आहे. अलिबागमध्ये होणारा पासपोर्टचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.

पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. टॉवर उभारणीसह विद्युतीकरण व फर्निचरचे काम आठवड्याभरात पुर्ण होईल. त्यानंतर जूलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे कार्यालय सुरु होण्याची शक्यता आहे.

सुनील थळकर – अधीक्षक
जिल्हा टपाल कार्यालय
Exit mobile version