14 सुवर्ण, 11 रौप्य, 6 कांस्य पदक पटकावले
। अलिबाग । प्रतिनिधी ।
दुसरी दक्षिण अशियायी लाठी स्पर्धा गोवा येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत अलिबागच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. या खेळाडूंनी भारतासाठी 14 सुवर्ण, 11 रौप्य आणि 6 कांस्य पदक पटकावले. त्यांनी अलिबागचे नाव देशामध्ये उंचावले आहे.
एकम लाठी प्रकारात रुद्रा विनय पिळणकर, मल्हार संदेश गुंजाळ यांनी सुवर्ण पदक मिळविले. द्विलाठी प्रकारात मंथन वैभव कदम, आयुष मगर यांनी सुवर्ण पदक पटकावले. पंचम लाठी (मुलांचे गट) प्रकारात शिवम गुंजाळ, देवदत्त पडवळ, हार्दिक अकोलकर, वेद कदम, मल्हार गुंजाळ यांनी सुवणर्र् पदक मिळविले. पंचम लाठी (मुलींचे गट)प्रकारात सई ठाकूर, रुद्रा पिळणकर, आराध्या नखाते, आराध्या मगर, आराध्या प्रथमेश वर्तक यांनी सुवर्ण पदक तसेच रुद्रा पिळणकर हीने द्विलाठी व द्वि अनिका प्रकारात दोन रौप्य पदक मिळविले. सई ठाकूर हीने एकम लाठी व द्वि अनिका प्रकारात दोन रौप्य, आराध्या नखाते व आराध्या मगर यांनी द्वि अनिका प्रकारात रौप्य पदक पटकावले.
प्रियेश मसाल यांनी द्विलाठी प्रकारात रौप्य, देवदत्त पडवळ याने एकम लाठी प्रकारात रौप्य, वेद कदम याने काटपवित्रा प्रकारात रौप्य, स्नेहा मसाल हीने एकम लाठी प्रकारात कांस्य, आराध्या नखाते हीने काटपवित्रा प्रकारात कांस्यपदक, मल्हार गुंजाळ, ऋग्वेद नाईक याने द्वि अनिका प्रकारात कांस्यपदक, ऋग्वेद नाईक एकम लाठी प्रकारात कांस्यपदक मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना लाठीचे मार्गदर्शन प्रियंका गुंजाळ व शुभम नखाते, वेदांत सुर्वे, सिद्धार्थ पाटील, सिद्धेश सत्वीडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच, लाठी असोसिएशन अलिबाग रायगड अध्यक्ष प्रमोद बाळकृष्ण मसाल यांच्याकडून ही सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात ाले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.