सुवर्ण पदकांसह कांस्य पदकांची लुट
। अलिबाग । प्रतिनिधी।
नवी मुंबई येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अलिबागच्या कराटे पट्टूंनी उत्तम कामगिरी बजावत सुवर्ण पदकासंह कांस्य, रौप्य अशी 25 हुन अधिक पदके मिळविली आहेत. प्रशिक्षण राहूल तावडे यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी कराटे स्पर्धेत बाजी मारलेली आहे. त्यांच्या या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
या स्पर्धेचे संयोजन युनिव्हर्स कराटे मार्शल आर्ट्स अकॅडमी इंडिया मार्फत झाले. यावेळी प्रमुख संघटक शिहान ढवळे यांची उपस्थिती होती. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत 866 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी कटा वकुमिते या दोन्ही प्रकारात अलिबागच्या कराटेपट्टूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यात नृपाल पाटील, वीर अजिंक्य, आरोही पाटील, शाल्विया चौलकर, पृथा जाधव, श्रीनिष मडवी, देवांश खोत, स्वयंम पाटील, श्रिया ठोंबरे, दिव्या पाटील, प्रिश गिरी, आहान गुरव, ऋग्वेद लोटे, मृदू भगत, तहा इकबाल, सुयश घेरडे, शुभ्रा घेरडे, श्लोक पाटील, वरद पाटी, निरज चवरकर, निष्ठा मनोहर, अवनी पाटील, रितिका हिवाळे, देवांश रोकडे या कराटेपट्टूंनी सुवर्ण, कांस्य व रौप्य पदके मिळविली आहेत. तसेच, जपान शीटोर्यू कराटे-डो इंडिया या संस्थेला बेस्ट डिसिप्लिन टिमला चषक देऊन सन्मानित करण्यात आले. व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून तनिष्क तावडे यांनी जबाबदारी पार पाडली.