अलिबाग रोहा रस्ता पुन्हा रखडला; कंत्राटदार झाला गायब

नारळ फोडल्यानंतर लोकप्रतिनिधी उदासिनच

। अलिबाग । भारत रांजणकर ।

अनेक आंदोलने, भुमीपूजन झालेल्या अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश मिळून चार वर्षे होत आली तरी या रस्त्याचे काम रखडलेल्या अवस्थेतच असल्याने जनतेत तीव्र नाराजीचे वातावरण आहे. सदर रस्त्याचे काम देण्यात आलेल्या ठेकेदार अग्रवाल कंपनी संपर्क क्षेत्राबाहेर असून त्यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही काहीच प्रतिसाद मिळित नसल्याने ठेकेदार काम न करताच मिळिालेले 18 कोटी घेऊन गायब झाल्याची जोरदार चर्चा केली जात आहे.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कार्यालयाच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदारांना वारंवार संपर्क साधला जात आहे. मात्र त्यांचा फोन संपर्क क्षेत्राबाहरे असल्याने संपर्कच होत नाही. त्यामुळे त्यांना मेलद्वारे नोटीस देखील बजावण्यात आल्याचे सांगितले.

शेकापचे आ. जयंत पाटील, तत्कालिन आदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या अलिबाग-रोहा मुख्य रस्त्याचे प्रत्यक्षात काम तत्कालिन भाजप-सेना सरकारने श्रेयवादासाठी रखडवून ठेवले होते. मात्र याचा पाठपुरावा केल्यानंतर सदर कामाला मंजुरी मिळाली. त्यानंतरही रखडलेल्या रस्त्यासाठी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी युवक संघटना आणि शेकाप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यावर सदर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मोठा गाजावाजा करीत श्रेयवादासाठी नारळ वाढवीत रस्त्याच्या कामाला शुभांरभ करण्यात आला. त्यालाही वर्षे व्हायला आले तरी प्रत्यक्षात थातूरमातूर दुरुस्ती सोडल्यास काहीच काम झालेले नाही. ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळिून अलिबाग-रोहा मुख्य रस्त्याच्या कामास मुहूर्त लागत नसल्याने लोकांध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

या रस्त्याचे काम अग्रवाल ठेकेदाराने घेतले. सदर कंत्राटदाराला बांधकाम विभागाकडून 18 कोटी आगावू रक्कम देखील देण्यात आली होती. पण हा रस्ता वार्‍यावर पडला आहे. याकडे ना लोकप्रतिनिधीचे लक्ष आहे ना अधिकार्‍यांचे. आगाऊ रक्कम घेऊन गायब झालेल्या कंत्राटदारामुळे अधिकारी देखील अडचणीत आले आहेत. सदर रक्कम देताना एक महिन्यात काम सुरु करण्यात आले नाही तर पुन्हा पैसे करण्याची अट होती. पण आज वर्षे होत आले तरी कामाला सुरुवातच झाली नसून कंत्राटदार गायब झाला आहे.

प्रत्यक्षात या रस्त्याचे कंत्राट अग्रवाल कंपनीने घेतले असताना खड्डे भरण्याचे काम वेगळ्याच कंत्राटदाराला देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नक्की याकामाचे ठेकेदार कोण असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

अलिबाग-रोहा मुख्य रस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवासी यांच्या समस्यांकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधून सदर समस्येचे निराकरण वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. अलिबाग-रोहा रस्त्यासाठी 150 कोटी रकमेचा निधी उपलब्ध होऊन, बराच कालावधी उलटून गेला आहे. मात्र या रस्त्याच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. सद्य:स्थितीत हा रस्ता खड्डेमय झाला आहे. पर्यायाने धुळीचे सा्राज्यही झाले आहे. सर्वसामान्य नागरीकांना गेली अनेक वर्ष या सस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळेच गेली अनेक वर्ष या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत.

शिक्षण आणि रोजगार या दोन महत्त उद्देशाने बस, सितारा, रिक्षा, मोटारसायकल अश्या दुचाकी- तीनचाकी-चारचाकी वाहनांच्या सहाय्याने प्रवास करणारे अनेक नागरीक आहेत. यातही विद्यार्थी आणि जेष्ठ यांची संख्या अधिक आहे. या परिसरातील तरूण, वयोवृध्द नागरीक, महिला विद्यार्थी सातत्याने अलिबाग येथे कामानिमित्त व दैनंदिन कामासाठी यावे लागत असल्याने या नादुरूस्त रस्त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. तसेच या रस्त्यावरून प्रवासी जीव मुठीत घेवून प्रवास करीत आहे.

दरम्यान अलिबाग-रोहा मुख्य रस्त्याचे काम रखडलेल्या अवस्थेतच असून ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. ज्या नेत्यांना या रस्त्याचे नारळ वाढवायचे असतील त्यांनी हवे तेवढे नारळ वाढवावे पण हा रस्ता एकदाचा पुरा करावा, आदी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

वैद्यकिय महाविद्यालयाच्या भूमीपूजन कार्यक्रमावेळी कंत्राटदाराला देण्यात येणार्‍या 18 कोटींमधील चार ते सहा कोटी रुपये रस्ते दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आल्याचे समजते. प्रत्यक्षात कंत्राटदाराला 12 कोटीच मिळिाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच या रस्त्याचे काम कंत्राटदार करायला तयार नसल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. यामुळे बांधकाम विभागाचे अधिकारी अडचणीत आले आहेत.

सदर रस्त्यासाठी ठेकेदाराला मोबीलायझेशनसाठी 18 कोटी देण्यात आले होते. मात्र रस्त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. त्यासाठी आम्ही ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा गेले दोन महिने वारंवार प्रयत्न करीत आहोत, मात्र त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्याचप्राणे त्यांना मेलद्वारे कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे. त्याचे देखील उत्तर मिळिालेले नाही.

जगदिश सुखदेवे
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधका विभाग
Exit mobile version