गणेभक्तांसाठी अलिबाग-सावंतवाडी एस टी बस सुटणार

। रायगड । खास प्रतिनिधी ।

चाकरमान्यांना गणेशोत्वासाठी कोकणातील आपल्या मुळ गावात जाता यावे, यासाठी अलिबाग एसटी आगारातून अलिबाग-सावंतवाडी गाडी सोडण्यात येणार आहे. अलिबाग एसटी आगारातून ही गाडी रविवारी (दि.17) सकाळी 7 वाजता सुटणार आहे. अलिबाग आगारातून दरवर्षी गणेशोत्सावात अलिबाग-सावंतवाडी ही गाडी सोडण्यात येते. दक्षिण रायगड तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशभक्तासाठी ही गाडी उपयोगी पडते. यंदा देखील गणेशोत्सवात अलिबाग-सावंतवाडी एसटी बस सोडण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग रहिवासी उत्कर्ष मंडळातर्फे करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन एसटी महामंडळाने अलिबाग-सावंतवाडी एसटी बस सोडण्यास मंजूरी दिली. 17 सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार्‍या या बसचे आरक्षण सुरू झाले आहे. ही गाडी माणगाव, महाड, पोलदपूर, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, लांजा, राजपूर, कणकवली, कसाल, कुडाळ मार्गे सावंतवाडील जाईल. ज्या गणेशभक्तांना या बसमधून प्रवास करायचा असेल त्यांनी अलिबाग एसटी आगारातील आरक्षण कक्षात संपर्क साधावा, असे आवाहन अलिबाग आगारातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version