। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गणेशत्सवासाठी चाकरमान्याना आपल्या गावी जाता यावे यासाठी अलिबाग आगरातून सावंतवाडी बस सोडण्यात येणार आहे. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता शिवशाही बस सोडण्यात येणार आहे. ही बस वडखळ, नागोठणे कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, कणकवली मार्गे जाईल, अशी माहिती अलिबाग आगारप्रमुख अजय वनारसे यांनी दिली. ही बस एकच दिवस (दि.29) सोडण्यात येणार आहे. परंतु या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी जास्त आहेत. त्यामुळे 30 ऑगस्ट रोजी देखील ही बस सोडावी,अशी मागणी गणेशभक्तांनी केली आहे.