। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
रिक्षा चालकाने जवळपास पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन महिलेला परत केली आहे. पेण येथील सुमित म्हात्रे हा पनवेल बस स्टँड व आकुर्ली मालेवाडी येथे रिक्षा व्यवसाय करतो. पनवेल येथे एक महिला व तिची लहान मुलगी रिक्षात बसली व ते मालेवाडी येथे उतरली. त्यानंतर आकुर्ली गावातील रिक्षा चालकांनी सुमित याला त्याच्या रिक्षेत चेन असल्याचे सांगितले. ती घेण्यासाठी कोणीतरी येईल यासाठी सुमित म्हात्रे थांबला. दोन दिवसांनी पनवेल येथे असताना सुमितजवळ एक महिला आली व तिने चैन पडली असल्याचे सांगितले. यावेळी ती चेन आपल्याला मिळाल्याचे सांगत त्या महिलेसह तो खांदेश्वर पोलीस ठाण्यात गेला.तेथे पोलिसांच्या समक्ष या महिलेला सुमित म्हात्रे, दत्ता भोपी, बाळू भोपी यांनी तिच्या मुलीची चैन परत केली. रिक्षाचालकाच्या या प्रामाणिकतेबद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे.