ल. नि. नातू यांचे निधन


| अलिबाग | प्रतिनिधी |

सेवानिवृृत्त माजी उपजिल्हाधिकारी तथा अलिबाग ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण निलकंठ नातू तथा ल. नि. नातू यांचे गुरुवारी पेण येथील राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 99 वर्षे पाच महिने होते.

ल. नि. नातू यांनी गेली अनेक वर्षे सरकारी सेवेत अधिकारी म्हणून काम केले होते. तहसीलदारपासून उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी काम केले होते. रायगड जिल्ह्यातील पेण व अलिबाग तसेच ठाणेमध्ये तहसीलदार म्हणून त्यांनी सेवा केली होती. त्यात सर्वात जास्त सेवा अलिबागमध्ये त्यांनी केली. त्यानंतर लोक न्यायालयात समन्वयक म्हणून त्यांनी भुमिका बजावली होती. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी समाजातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. एक शिस्तबध्द व मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. अलिबाग ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 18 वर्षे सेवा केली. त्यांच्या प्रयत्नाने अलिबाग तालुक्यात अठरा ज्येष्ठ नागरिक संघटना सुरु झाल्या. गेली अनेक वर्षे त्यांचे अलिबागमध्ये वास्तव्य होते. वृध्दापकाळाने त्यांची प्रकृती खालावल्याने पेण येथील त्यांचे भाचे उदय साठे यांच्याकडे ते राहत होते. गुरुवार दि. 25 जानेवारी रोजी पेण येथे त्यांचे दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

Exit mobile version