आजपासून अलिबाग तालुका शालेय कला, क्रीडा महोत्सव

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माणुसकी प्रतिष्ठान, रायगड प्रिमियर लिग आणि सुरभी स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 20 मार्च या कालावधीत अलिबाग तालुका शालेय कला आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आहे अशी माहिती या महोत्सवाचे निमंत्रक माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवासाठी आर्.सी.एफ – थळ यांचे प्रयोजकत्व लाभले आहे, अशी माहिती डॉ राजाराम हुलवान यांनी दिली. रायगड प्रिमियर लिगचे सचिव व रायगड जिल्हा क्रिकेट सोसिएशनचे कार्योपाध्यक्ष जयंत नाईक, सुरभी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सुप्रिया जेधे, रायगड जिल्हा परिषद जिल्हा समन्वयक संदीप वारगे यावेळी उपस्थित होते.

200 मी.,800 मी.धावणे,लांब उडी,गोळाफेक, कबड्डी, खो खो,पासिंग व्हॉलीबॉल , सायकलिंग, फुटबॉल, लाठीकाठी आणि बुध्दिबळ तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात नव्याने प्रसार होत असलेल्या महिला ( 19 वर्षांखालील) लेदरबॉल क्रिकेट या क्रीडाप्रकारांचा या महोत्सावात समवेश करण्यात आला आहे. स्पर्धा कार्यक्रम आर.सी.एफ कुरुळ येथील क्रीडा संकुल, जिल्हा पोलिस कार्यालयाचे मैदान, नेहुली येथील जिल्हा क्रिडा संकुल आणि महिला लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा खानाव येथे होणार आहेत. सर्व सहभागी खेळाडुंना, शाळांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. विजेत्या खेळाडूंना पदके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी असल्याने ज्या शाळेतील विद्यार्थी जास्त पदके मिळवतील त्या शाळेला स्पर्धा विजेतेपदाचा चषक देण्यात येईल.

Exit mobile version