| खारेपाट | प्रतिनिधी |
सावन फाऊंडेशन कोल्हापूर तर्फे ओपन डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अलिबाग तालुक्यातील आवास येथील सामाजिक कार्यकर्ते रणजीत राणे यांच्या पाळीव कुत्र्याने कोल्हापूरच्या डॉग शोमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मॅरेथॉन किंवा धावणे अशा अनेक मानवी स्पर्धा सर्वत्र होत असतात; परंतु, पशुपक्षी किंवा पाळीव प्राण्यांनाही चांगले शिक्षण दिल्यास ते देखील या स्पर्धा खेळू शकतात हे यावरून अधोरेखित झाले. दरम्यान, अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील विविध पाळीव प्राणी संघटना व संस्थाकडून रणजीत राणे यांचे कौतुक होत आहे.







