। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या 19 व्या ऑल सिलंबम (लाठीकाठी) महाराष्ट्र स्टेट असोसिएशनच्या चॅम्पियन स्पर्धेमध्ये अलिबागच्या चार कराटे सुवर्णपदकांसह सहा रौप्य आणि तीन कांस्यपदके अशी एकूण तेरा पदके मिळवून अलिबागच्या नावलौकिकात भर घातली आहे.
या स्पर्धेत जय संतोष कवळे, नवगाव, दानपट्टा फिरवणे, जिज्ञासा सुधीर पाटील, पेढांबे (नाना पाटील हायस्कूल, पेझारी) स्टिक फाईट, श्रमिका श्रीधर पाटील, महाजने (स.रा.तें. हायस्कूल, रेवदंडा) डबल स्टिक, दीप महेंद्र पाटील, मेढेखार (पीएनपी हायस्कूल, कुसुंबळे) या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली.
अनघा हेमंत पाटील, झिराड, स्मिती सुभाष कडवे, मिळकतखार, दक्ष सचिन नाईक, बांधण, ऋग्वेद प्रकाश पाटील, बहिरोळे, स्मिती नितीन म्हात्रे, हाशिवरे, ऋतू राजेंद्र पाटील, बांधण या विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकाविले. तर, वेदिका संतोष कवळे, नवगाव, शिवायांनी प्रफुल्ल म्हात्रे, मिळकतखार, ऋतुजा राजेंद्र पाटील, नवीन बांधण या विद्यार्थ्यांनी कांस्यपदाकवर नाव कोरले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र संघटनेचे सचिव पी.वाय. आत्तार, टेक्निकल चेअरमन डॉ. जिया, सहसचिव संतोष कवळे, बाळा साठे आणि संतोष खैरनार आदींच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सर्व खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्याचबरोबर उत्कृष्ट पंच म्हणून वेदिका कवळे, जिज्ञासा पाटील, जय कवळे यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक संतोष कवळे, रोहन गुरव, संचिता पाटील, प्रथमेश पाटील, जिज्ञासा पाटील, तनया मंचेकर, पनवेलचे अक्षय जाधव, रणजीत मडवी, पेझरीचे शाळेचे पुरुषोत्तम पिंगळे, संदीप वारगे यांच्याकडून मार्गदर्शन लाभले. सर्व विजेत्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याकडून स्वागत होत आहे.