| पोलादपूर | प्रतिनिधी |
“हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवू या, धरती-नभ-पाताळ ही भारू, प्राण पणाला लावू या” या घोषवाक्याने एकात्मतेचा संदेश देत पोलादपूर विभागात सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत प्रभात नगर येथील मंगलमूर्ती पार्क येथे हे संमेलन रंगणार असून, यामध्ये समाजातील मतभेद व मनभेद दूर करून एकजूट मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला जाणार आहे.
संमेलनात आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, मान्यवर वक्ते समाजजागृती, एकात्मता आणि संघटन या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक प्रश्नांवर सामूहिक तोडगा काढण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.
या संमेलनास सर्व नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार पारंपारिक वेशात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक सकल हिंदू समाज, पोलादपूरतर्फे करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध आणि भारतमातेच्या प्रतिमांचा संदर्भ हिंदू एकात्मतेच्या संमेलनासाठी करण्यात आला आहे.
