अखिल भारतीय पोलीस कबड्डी स्पर्धा

महाराष्ट्राच्या तिन पंचाची निवड

| गडब | वार्ताहर |

हरयाणा मधुबन कर्णाला येथे 72 वी अखिल भारतिय पोलीस कबड्डी स्पर्धा 2023 चार ते आठ ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी आरती अजय बारी मुंबई-उपनगर, विनोद विद्याधर पाटील-रायगड, समध ईब्राहीम बुरोंडकर-रत्नागिरी या महाराष्ट्रातील तिन पंचाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण 15 पंचांची निवड झाली असून तीन पंच हे महाराष्ट्रातील आहेत.

या स्पर्धेसाठी सलग आठ वेळा प्रो कबड्डी सामन्यांमध्ये पंच राहिलेल्या आंतरराष्ट्रीय पंच आरती अजय बारी ह्या मुख्य पंच आहेत. आरती बारी यांची अनेक स्पर्धेकरिता पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. हरयाणा मधुबन कर्णाला येथे 72 वी अखिल भारतिय पोलीस कबड्डी स्पर्धा होणार. या स्पर्धेत भारत देशातील सर्व राज्यातील पोलीस विभाग कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामध्ये पोलीस विभागातील वेगवेगळे खेळ खेळ खेळले जाणार आहेत. त्यामुळे पोलीस विभागातील खेळाडूंना ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विनोद पाटील व समध ईब्राहीम बुरोंडकर यांनी अनेक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धामध्ये पंच म्हणुन कामगिरी केली आहे.

Exit mobile version