चिंभावे येथे ऑल इंडिया शूटिंग बॉल स्पर्धा

देशभरातून विविध संघ होणार स्पर्धेत सहभागी

| महाड | प्रतिनिधी |

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गाझी स्पोर्ट्स क्लब चिंभावे आयोजित ऑल इंडिया शूटिंग स्पर्धा 1 व 2 मे रोजी चिंभावे येथे भरविण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये राज्यातील तसेच भारत देशातीलदेखील ठराविक संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच महिला संघदेखील सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सध्या मैदान आखणे, रोषणाई आदी स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे.

या स्पर्धेचे अध्यक्ष जयवंत दळवी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली होणार असून, जमातून मुस्लिम चिंभावे अध्यक्ष मकबूल चांदले, ग्रामपंचायत चिंभावे सरपंच विक्रम मालप, सुतार संघटना महाड पोलादपूर अध्यक्ष लहू काणेकर, भाजप मुंबई उपाध्यक्ष सिद्धार्थ गमरे हे उपाध्यक्ष, तर सदस्य गाव कमिटी आणि गाझी स्पोर्ट्स क्लब सदस्य हे कमिटी मेम्बर्स असून, फारुक चांदले, जमालभाई झटाम, जुल्फीकार नेकवारे, रफिक समनाके, शेबाझ गीते, असिफ बिया, जुबेर समनाके हे या स्पर्धांचे आयोजक आहेत.

या स्पर्धेत राज्याबाहेरील एम्स दिल्ली अरुण शर्मा युपी, खली पंजाब, जितेंद्र मध्य प्रदेश, रमेश बंदा राजस्थान, विनीत भास्कर उत्तराखंड तसेच राजपाल हरियाणा विपिन चावल हे संघ सामील होणार असून, महाराष्ट्रातील मालेगाव आयएफसी वाकर, मालेगाव इष्टियाक, मालेगाव खुशीद, जामनेर शोएब, सोलापूर आमिर काझी, कोल्हापूर विजय लयकर, सांगली मेनोराजुरी युथ फाऊंडेशन, सोलापूर गायकवाड नितीन, पुणे विद्यापीठ देवकर, औरंगाबाद अय्याज, सांगली सिटी महेंत बाली, सोलापूर 2 जैन खेंडागळे, सांगली डिस्ट्रिक्ट बबलू, सांगली मेनोराजुरी सुशांत पेवर, कोल्हापूर घारेगुठी, गाझी स्पोर्ट क्लब चिंभावे तसेच महाराष्ट्रातील महिला ग्रुप परवली, नाशिक, सांगली, औरंगाबाद, कराड आणि पुणे येथील संघ या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. ग्रामीण भाग असलेल्या चिंभावे येथे देश पातळीवरील शूटिंग बॉल स्पर्धेची महाड तालुक्यातील नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Exit mobile version