। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर नगरपंचायतीची सुधारित आरक्षण सोडत नुकताच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये तीन प्रभाग वगळता अन्य सर्व प्रभागातील आरक्षण संरचना कायम ठेवली आहे. यामुळे सर्वपक्षीय पदाधिकार्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षणाची संख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक नसावी, यासाठीच राज्य निवडणूक आयोगाने ना.मा.प्र.आरक्षणाची सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम राबविला आहे. यान्वये जिल्हाधिकारी रायगड, अलिबाग यांचे आदेशानुसार खालापूर नगरपंचायत सदस्य पदाच्या ना.मा.प्र सुधारित आरक्षण सोडत नुकताच नेताजी पालकर सभागृह, तहसिल कार्यालय, खालापूर येथे उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे, मुख्याधिकारी रश्मी शिंदे यांचे नियंत्रणाखाली करण्यात आली. यानुसार, प्रभाग क्र. 2, प्रभाग क्र.11 आणि 16 मधील आरक्षण बदलले आहेत.दरम्यान, सेनेचे नेते उमेश गांवड, शेकापक्षाचे संतोष जंगम यांनी विविध प्रश्न विचारले असून, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, मुख्याधिकारी रश्मी शिंदे यांनी शंकाचे निरसन केले आहे.
खालापूर नगरपंचायत सुधारित आरक्षण रचना
1) साबाईनगर – अनुसूचित जाती (स्त्री किंवा पुरूष),
2) शिरवलीवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग(खुला),
3) वनवेवाडी – सर्वसाधारण
4) निंबोंडे – अनुसूचित जमाती (महिला राखीव)
5) दांडवाडी – (नागरिकांचा मागास प्रवर्ग,महिला राखीव),
6) वनवे – नागरिकांचा मागास प्रवर्ग(सर्वसाधारण),
7) पाटील आळी – (नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला, राखीव,
8) खडक आळी – (अनुसूचित जमाती)
9) मोरेवाडी – (अनुसूचित जाती राखीव)
10) बाजारपेठ – अनुसूचित जमाती महिला(राखीव),
11) चाळके आळी – सर्वसाधारण महिला (राखीव),
12) फराट आळी – सर्वसाधारण,
13) कुंभार आळी – अनुसूचित जमाती राखीव,
14) क्रांतिनगर – सर्वसाधारण (स्त्री किंवा पुरूष),
15) ब्राह्मण महड – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला( राखीव)
16) गुरव आळी महड 2 – सर्वसाधारण(स्त्री)
17)आदिवासीवाडी महड-3 अनुसूचित जमाती महिला (राखीव)
- सुधारित आरक्षण जाहीर होताच सर्व प्रभागात बदल घडू शकतात, असे वाटले होते. परंतु तसे जरी झाले नसले तरी. आम्ही या बदलाचे स्वागत करू. – शिवानी जंगम, माजी नगराध्यक्षा, खालापूर