कोव्हीडचे सर्व निर्बंध ३१ मार्चपासून हटविणार; पण ‘या’ गोष्टींचे पालन बंधनकारक

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशभरात कोरोना संपल्यातच जमा असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे बुधवारी गृहमंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कोविड प्रतिबंधात्मक तरतूद रद्द करण्याचे आदेश काढले असून, हे सर्व निर्बंध ३१ मार्चपासून हटविण्यात येणार आहेत. पण मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम मात्र पाळावे लागणार आहेत.

कोरोनामुळे बिघडलेली आरोग्य व्यवस्था आता सर्वच बाजूंनी सुधारली आहे. तसेच सरकारही आता या महामारीशी लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन ऑथरिटीने हा निर्णय घेतला आहे. अजय भल्ला, केंद्रीय गृहसचिव

Exit mobile version