विद्यार्थ्यांच्या भविष्याचे दरवाजे उघडतोय; मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन

राज्यातील शाळा दीड वर्षांनी भरल्या
। मुंबई । प्रतिनिधी ।
कोरोनाने आपल्याला काय शिकवलंय याचा अंदाज घेऊन पुढचं आयुष्य आरोग्यदायी व्हावं. हीच जबाबदारी सरकारची आहे. शाळेचे नाही तर आज आपण मुलांच्या भविष्याचं, विकासाचं, प्रगतीचं दार मुलांसाठी उघडतो आहोत. एकदा उघडलेले शाळा बंद होणार नाही या निर्धाराने आजपासून या नवीन आयुष्याची आपण सुरवात करु, असे भावनात्मक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी राज्यातील शिक्षक,विद्यार्थ्यांना म्हणाले.

कोरोेनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा सोमवारपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला आहे.

आरोग्याबाबत शंका आली तर
मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षकांना कधीही आरोग्याबाबत शंका आली तर त्यांनी कोरोना चाचणी करणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. ऋतू बदलत असतांना साथीचे रोग येत असतात. त्यामुळे या दरम्यान कोरोना तर आला नाही ना, याची खात्री करुन घेणे महत्वाचे आहे.असेही ते म्हणाले.

शिक्षणाची जागा, वर्ग बंदिस्त नसायला हवे, ते उघडे असायला हवे. दारं, खिडक्या उघड्या असायला हव्या, जशे हसते खेळते मुलं तशी खेळती हवा वर्गात राहायला हवी. तसेच सोशल डिस्टंगिंचे पालन करणे, स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.


उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री

Exit mobile version