। महाड । प्रतिनिधी ।
महाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी 10 प्रभागांतील 20 जागांसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. महाड नगर परिषदेच्या 10 जागा सर्व साधारण पुरुष उमेदवार, 9 जागा सर्व साधारण महिला उमेदवार तर 1 जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे.
महाड नगर परिषदेच्या प्रभाग क्र 3 ब ही जागा अनुसूचीत जाती/जमातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे, तर उर्वरित 9 जागा सर्वसाधारण महिला उमेदवारांसाठी आरक्षित असतील. तर 10 जागा पुरुष सर्व साधारण उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ओबीसी आरक्षणाखेरीज निवडणुका होणार असल्याने खुल्या गटातील उमेदवारांना या निवडणुकीत चांगली संधी मिळणार आहे.







