अलिबागमध्ये सर्वकाळी ‘अवकाळी’ ….

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुलाबी थंडीतील या अवकाळीमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आज (दि.22 जाने.) सकाळपासून अलिबागमध्ये ढगाळ वातावरण दिसत होते. यातच दुपारी पावसाच्या सरी कोसळू लागल्याने वातावरणात पुन्हा एकदा आर्दता निर्माण झाली आहे. अलिबाग परिसरात सर्वकाळी असणारी ही अवकाळी पाहून नागरिकांमधून, नेमकं स्वेटर वापरायचा की रेनकोट अशा उपहासात्मक चर्चांना उधाण आले असून, अशा आशयाचे मॅसेजेस पुन्हा एकदा सोशल मिडीयावर व्हायरल होवू लागले आहेत.
मात्र, हा भाग विनोदात्मक अंगाने नागरिक पाहत असले तरी तज्ज्ञांनी आरोग्यसाठी धोकादायक असल्याची सूचना केली आहे. शिवाय ओमिक्रॉनची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याची तसेच वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version