गौरी पूजन साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग

मुरूड | वार्ताहर |
कोकणात गौरी-गणपती पूजनाला विशेष महत्त्व असून सोमवारी गौरी पूजन होणार आहे. मुरुडच्या मुख्य मार्केटमध्ये रविवारी सुगडे, देवीचे मुखवटे,सुवासिक अगरबत्ती,काळा भोपळा आणि पूजा साहित्य घेण्यासाठी महिलांची मोठी लगबग दिसून येत होती.
मार्केट आणि बाजारपेठ गर्दीने फुलून गेले होते. अनेक प्रकारची फळे, भाज्या खरेदीसाठी विविध गावातील ग्रामस्थ, नागरिक यांची मोठी वर्दळ दिसत होती. कोकणात शेतकरी  तेरड्याचे रोप आणून सुपात लावतात. त्यावर मुखवटे ठेऊन त्याला साडी नेसवितात.गौरी रविवारी घरोघरी आल्या आहेत.सोमवारी स्थापना केली जाणार आहे तर  मंगळवारी विसर्जन केले जाईल. यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण आहे.गावागावांतून आरतीचे मंगलमय सूर कानावर पडत आहेत.

Exit mobile version