। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागचे (Alibag) बंडखोर आ. महेंद्र दळवी यांच्यावरील एका गुन्ह्यातील आरोप सिद्ध झाल्याने राष्ट्रपती निवडणूकीतील त्यांचे मतदान नाकारण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटातील आ. महेंद दळवी मतदान करु शकणार नाहीत.
तीन वर्षापूर्वी निवडणूकीवरुन दोन गटात तीन वर्षापूर्वी मारहाण झाली होती. यामध्ये 9 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये आ. महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांचादेखील समावेश होता. दळवी हे शिवसेनेचे आमदार असून अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांना त्या मारहाण प्रकरणात शिक्षा सुनावली होती. दळवींसह अन्य तिघांना दोन वर्षांचा कारावास अशी शिक्षा न्यायालयाने दिली होती. 13 मे रोजी त्याचा निकाल लागला होता. मात्र याप्रकरणी दळवी यांच्याकडून पुढील पर्यायांची चाचणी सुरु झाली आहे, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.