शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादीकरिता महामंडळाकडून सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती करिता अर्ज मागविण्यात आले आहेत.
ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रिका, 2 फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादीसह दोन प्रतीत पूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह आपले अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय, रायगड-अलिबाग, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या., सदनिका क्र. 2, तळ मजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे, पो.अलिबाग, ता.अलिबाग, जिल्हा-रायगड- 402 201 येथे दि.25 जुलै 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक अंगद लिंबाजी कांबळे यांनी केले आहे.