अखिलेश यादवांकडून युतीचा शस्त्रप्रयोग

काकापुतण्यातील वैर संपुष्टात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर, परस्परांमधील राजकीय वैर विसरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या काकांच्या प्रगतीशील समाजवादी पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही असून काका शिवपाल यादव यांच्यासाठी ही दिवाळीची मोठी भेट असल्याचे मानले जात आहे.
एरव्ही युद्धात आणि प्रेमात सारेकाही क्षम्य असणारा वाक्प्रयोग बदलत्या काळानुसार, निवडणुका जिंकण्यासाठी सारं काही चालतं असे स्वरूप धारण करते. अर्थातच, जगातील सर्वात मोठी लोकशाही ज्या देशात नांदते, त्या देशात राजकीय घडामोडींची विविध आणि वैचित्र्यपूर्ण चित्रे अनुभवास येणे काही नवीन नाही. निवडणुकांमध्ये जिंंकण्यासाठी त्यापेक्षाही आपल्या विरोधकाला हरविण्यासाठी आपल्या तत्वाला मुरड घालत कोणत्याही भूमिका स्वीकारण्यास राजकीय नेते तयार असतात.
आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले असून सध्या विविध राजकीय घडामोडी अनुभवाय येत आहेत. त्यातच अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री पदासाठी निवडणुक लढणार नसल्याचे, नुकताच जाहीर केले असतानाच योगीला हरविण्यासाठी युतीच्या शस्त्राचा प्रयोग अवलंबिला आहे. शिवपाल सिंह सपासोबत युती करण्यात बराच काळ गुंतले असून सतत वक्तव्येही करत होते. पण, अखिलेश यादव यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत अखिलेश म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत सपा काकांच्या प्रगतीशील समाज पक्षासह प्रादेशिक पक्षांसोबत युती करणार आहे. त्याचप्रमाणे, काकांना पूर्ण सन्मान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या शिवपाल सिंह यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे. कारण, ते आपल्या राजकीय अस्तित्वासाठी लढत होते. राज्यात पीएसपीचे विलीनीकरण व्हावे, यासाठी सपा त्यांच्यावर दबाव आणत होती. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून काका-पुतण्यांमध्ये राजकीय वैर आहे. मुलायमसिंह यादव यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे युद्ध संपुष्टात येऊ शकते, असं मानले जात होते.

Exit mobile version