विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकांचे वाटप

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून साखर गावातील सामाजीक कार्यकर्ते मनोज हारे यांच्या कडून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी 15 बाकांचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या कार्यासाठी शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. यावेळी मनोज हारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजस तांडेल, पांडुरंग पेरेकर, रविंद्र चौलकर, हेमंत सारंग, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, उपशिक्षिका स्मिता चिखले, अमिषा मुंढे, अंगणवाडी सेविका रिमा गुरव तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version