दिव्यांगांना 5%  निधीचे वाटप

। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायत हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना सन 2021-22 या आर्थिक वर्षातील 5% दिव्यांग निधीचे वाटप आ. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी अस्मिता भोरावकर, चंद्रकांत रोडे,नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चव्हाण,गोविंद ओमासे, राष्ट्रवादी,शिवसेना व भाजपचे नगरसेवक यांसह शहरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरातील 75 दिव्यांग बांधवांना  मान्यवरांच्या हस्ते 5% निधीचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version