। तळा । वार्ताहर ।
तळा तालुका सहकार्य अपंग (दिव्यांग) कल्याणकारी संस्थेची स्थापना दि. 19 जून रोजी तळा येथे करण्यात आली. शिवाजी पंडित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तळा येथे किशोर पितळे यांच्या निवासस्थानी ही सभा पार पडली. या सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये किशोर पितळे (अध्यक्ष), कृष्णा भोसले (उपाध्यक्ष), सहादेव पारधी (उपाध्यक्ष), अमिष भौड सरचिटणीस, नरेश भौड उपसचिव, प्रकाश मेकडे खजिनदार, तर सल्लागारपदी सतीश पैठणकर, मोरेश्वर फुलारे, शरद खातु, महेंद्र सुर्वे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
लवकरच तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांसठी एक शिबीर भरवून त्यांना साहित्य वाटप करण्यात येईल. त्याआधी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आपले आधार कार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, दोन फोटो, दिव्यांग दाखला तालुकाध्यक्ष किशोर पितळे व अन्य पदाधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.