पत्रकारांना इंन्सुरन्स पॉलिसीचे वाटप

पेण । प्रतिनिधी ।
पेण महात्मा गांधी वाचनालय येथे रायगड जिल्हा प्रेस क्लॅबचे अध्यक्ष भरत रांजणकर यांच्या उपस्थितीत पेण तालुक्यातील सर्व पत्रकारांना इंन्सुरन्स पॉलिसीचे वाटप करण्यात आले. तालुक्याच्या पत्रकारांचा सहानभुतीपूर्वक विचार करुन या पॉलिसीसाठी सर्व आर्थिक भार उदयोजक प्रशांत पाटील व अंबिवली सरपंच नेहा पाटील यांनी उचलला. या वेळी अध्यक्ष भरत रांजणकर यांनी सांगितले की, पेण तालुका सर्व चळवळीचा केंद्र बिंदू असून पेणचे पत्रकार हे सर्व बाबीत इतरांपेक्षा पुढेच असतात. संघटना संघटनांमधील मतभेद विसरुन आज सर्व पत्रकार एकत्र आले याचा आनंद आहे कारण पत्रकारांना प्रसिध्दीसाठी सर्वजण बोलावतात. मात्र, त्यांच्यावर दुर्दैवाने एखादा कधी वाईट प्रसंग आल्यास सर्वच मंडळी पाठ फिरवतात. त्यानंतर पत्रकारांना पत्रकारांचे सर्व काही निस्तरावे लागते. देवाकडे एवढीच प्रार्थना करेल की, ही इंन्सुरन्स पॉलिसी कुणालाच वापरण्याची गरज भासू नये.

पेणच्या पत्रकारांचा आदर्श सर्व जिल्हयाच्या पत्रकारांनी घ्यावे आज खर्‍या अर्थाने पत्रकारांने पत्रकारांसाठी हा कार्यक्रम राबविला आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुर्यकांत पाटील, उदय काटे, संतोष पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार सुभाष टेंबे यांनी केले. या कार्यक्रमासाठी इंन्सुरन्स कंपनीचे उदय काटे, प्रशांत पाटील, नेहा पाटील, विजय मोकल, संतोष पाटील, देवानंद पेरवी हे उपस्थित होते.

Exit mobile version