पोयनाड पंचक्रोशीत सावित्रीच्या लेकींना सायकल वाटप

चित्रलेखा पाटील, चित्रा पाटील यांच्या हस्ते वितरण
। भाकरवड । जीवन पाटील ।
अलिबाग तालुक्यातील पोयनाड ग्रामपंचायत हद्दीतील भाकरवड नविन देहेन, नवेनगर पोयनाड आदिवासी वाडी, घसवड आंबेवाडी, पांडवादेवी, पोयनाड, या पंचक्रोशीतील इयत्ता पाचवी ते अकरावी च्या विद्यार्थीना रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या सध्यक्षा चित्रा पाटील पंचायत समितीच्या सदस्य रचना ताई म्हात्रे, पोयनाड सरपंच शकुंतला काकडे, उपसरपंच सचिन पाटील, ग्रामविकास अधिकारी वैभव ठाकूर माजी सरपंच भूषण चवरकर, ग्रामपंचायत सदस्य अनिता पाटील, आश्विनी पाटील, रेश्मा सेजपाल ट्रस्टी, झुंझार मंडळाचे अध्यक्ष अनवर बुराण, सचिव किशोर तावडे, विजेंद्र तावडे, आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात गणेशाच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून तर रायगड चे भाग्यविधाते स्व प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सर्व कार्यकर्ते यांचे आभार मानले. हा कार्यक्रम शनिवार दि २१ मे रोजी झुंझार मैदानात पार पडला. त्यावेळी सावित्रीच्या लेकींना ११५ सायकलींचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version