। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील पोयनाड ग्रामपंचायत हद्दीतील तलाव पाळीवर जि.प. सदस्य चित्रा पाटील यांच्या हस्ते शेडचे उद्घाटन करण्यात आले. गणपती विसर्जन घाट, लक्ष्मीनारायण मंदिर तसेच बाबा हजरत जमालूद्दीन दर्गा यासमोर या शेडची मागणी ग्रामस्थ तसेच व्यापारी वर्गाने केली होती. पोयनाड बाजारपेठ तसेच कोणत्याही सामाजिक आध्यात्मिक तसेच शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता योग्य रीतीने वापर करता येणार आहे.
याप्रसंगी पं.स. सदस्य रचना म्हात्रे, पोयनाड सरपंच शकुंतला काकडे, उपसरपंच सचिन पाटील, ग्रामसेवक आर.ए. पाटील, माजी सरपंच भूषण चवरकर, महेश आगरवाल, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैन, सदस्य मोनाली चवरकर, शैलेश गायकवाड, विजेंद्र तावडे, संतोष पाटील, नमित चवरकर, रवी भट, हजरत जमालूद्दीन दर्गाचे सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. या कामासाठी कमी वेळ असतानादेखील वैभव काकडे यांनी पूर्ण केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अॅड. आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासकामे झपाट्याने सुरु असून, ती पूर्णत्वास नेण्यास शेकाप आग्रही आहे. पोयनाड बाजारात कचरा संकलनासाठी मोठे स्टोरेज विल बॉक्स झेप फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात येतील.
चित्रा पाटील, जि.प. सदस्य