दिव्यांगत्वाचे तपासणी करून प्रमाणपत्र वाटप

| श्रीवर्धन | वार्ताहर |

रायगड जिल्हा रुग्णालय अलिबाग व उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन आणि एकता दिव्यांग कल्याणकारी संघटना श्रीवर्धन यांच्या वतीने दिव्यांग व्यक्ती तपासणी शिबीर व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे घेण्यात आला. या शिबिरात 146 दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हे शिबीर हे केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांतर्गत घेण्यात आले. श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे. त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी एकता दिव्यांग कल्याणकारी संस्था यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला आहे, असे निलेश नाक्ती यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गौतम देसाई, डॉ. प्रतिभा फडतरे, डॉ. शुभम शेळके, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष निलेश नाक्ती, मुईद सरखोत, नवाब कुद्रते, भरत पवार, संतोष पारधी, उदय माळी, प्रियांका कासार, सुनील गायकर यांच्यासह युवा कुणबी संघटनेचे सागर जाधव, संतोष रटाटे, सुनील कान्द्रे व असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Exit mobile version