आदिवासी विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप

| नेरळ | वार्ताहर |

दामत ग्रामपंचायतीमधील टाकाची वाडी ही आदिवासी वाडी दुर्गम भागात वसलेली आहे. या आदिवासी वाडीमधील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात असतात. आदिवासी कुटुंबातील असलेले अनेक विद्यार्थी हे कधी प्लास्टिक पिशवीमध्ये तर कधी कापडी पिशवीमध्ये शाळेची पुस्तके घेवून येत होती. त्यामुळे भडवल गावातील रहिवाशी असलेले मनोज जामघरे यांनी सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषद शाळेत येणाऱ्या सर्व 55 विद्यार्थ्यांना चांगले दर्जाची स्कूल दफ्तर भेट देण्यात आली.

यावेळी किरण ठाकरे, राजेश भगत, नितीन कांदळगावकर, संदीप म्हसकर, संजय कराळे, नरेश मसणे, प्रशांत राणे, समीर बोराडे मनोज जामघरे, प्रसन्न पाटील,सोमनाथ जामघरे, योगेश लोभी, कमलाकर मेंगळ, चेतन पाटील, रामदास जामघरे, जयेश पाटील, कैलास पाटील, अमोल दहीवलिकर, यश राणे आदी उपस्थित होते.

Exit mobile version