विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे वाटप

| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली शहरातील जनता विद्यालय आणि वसंत देशमुख मेमोरियल स्कूलच्या विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे वितरण करण्यात आले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे आणि वसंत देशमुख मेमोरियल स्कूलच्या संचालिका तेजस्वी देशमुख यांनी महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक जाणीवने युवतींसाठी लायन्स क्लब खोपोलीकडून दिल्या गेलेल्या अनोख्या भेटीचा स्वीकार केला. या मशीन मेसर्स ए. आर. टेक्नोसॉफ्ट या कंपनीच्या माध्यमातून पुरविल्या गेल्या आहेत. अध्यक्षा शिल्पा मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रोजेक्ट चेअरमन म्हणून अनुराधा कट्टी यांनी भूमिका बजावली. संगीता पिल्ले, पल्लवी पडवळकर, आशा देशमुख, नाईक, अतिक खोत, अविनाश राऊत इत्यादी लायन मेंबर्सनी या उपक्रमात सहभाग घेतला.

Exit mobile version