रस्ता, रेल्वे ओव्हरब्रीजने 22 गावांना पर्यायी मार्ग

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना साकडे
। नेरळ । वार्ताहार ।

कर्जत तालुक्यातील वासरे परिसरात पोहचणे सहज शक्य व्हावे यासाठी तालुक्यातील आवळस पासून पळसदरी रेल्वे स्टेशन पर्यंत रस्ता आणि कर्जत पुणे रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधण्याची मागणी सुनिल गोगटे यांचे माध्यमातून केली आहे. त्या मागणी साठी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे यांच्याकडे करण्यात आली असून त्यास सकारात्मक प्रतिसाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दाखवला आहे. दरम्यान,रेल्वे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने हा प्रकल्प राबविल्यास कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायत मधील 22 गावे जोडली जाऊ शकतात.
गेली कित्येक वर्ष कर्जत तालुक्यातील वासरे खोंड्यातील जनतेला अपेक्षित असलेला बीड-पळसदरी रस्ता आणि रेल्वे फ्लायओव्हर होण्यासाठी भाजपा नेते सुनिल गोगटे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना या संदर्भात पत्र देऊन मागणी केली असून लवकरच ही मागणी पूर्ण करण्याचे ठोस आश्‍वासन केंद्रीय मंत्र्यानी दिले आहे.

याच रस्त्यांना जोडणारा हा रेल्वे ओव्हरब्रीज अंदाजे साडेसतरा कोटीचा असून याची मागणी गोगटे यांनी केली असता रेल्वे मंत्र्यांनी याला हिरवा कंदील दिला असून संबंधित ओव्हर ब्रीजसाठी राज्यसरकारकडून योग्य असा प्रस्ताव तयार करून घेऊन आम्ही लवकरच हे काम मार्गी लावू असे पत्र त्यांनी सुनिल गोगटे यांना दिले आहे.

Exit mobile version