। खांब । वार्ताहर ।
गेली अनेक वर्ष राजकारण करीत असताना सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवत, त्यांच्यापर्यंत विकास कसा जाईल, हाच विचार केला असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता नसली तरी रोहा तालुका विकासाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही, असे ठाम वक्तव्य खा. सुनिल तटकरे यांनी केले. खांब देवकान्हे विभागातील नडवली, तळवली, चिल्हे, धानकांन्हे, देवकान्हे येथे विविध विकासकामांच्या भूमीपुजन व लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी धानकान्हे येथे संपन्न झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे, सरपंच वसंत भोईर, ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण धनवी, माजी उपसभापती बाळकृष्ण बामणे, विभागीय अध्यक्ष रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, वसंत मरवडे, राम मरवडे, तानाजी जाधव, गजानन बामणे, सूरज कचरे, गजानन भोईर, घनश्याम कराळे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भोईर, माजी सदस्य संतोष कोंडे, मनोज शिर्के, नरेंद्र जाधव, नरेंद्र पवार, माजी सरपंच मंगेश भोईर, दयाराम भोईर, संतोष कोंडे, पोलीस पाटील दयाराम भोईर यांसह ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विभागातील ज्येष्ठांची साथ त्या काळामधे प्रामाणिकपणे मिळाली. या परिसरात दुबार भातशेतीकरीता प्रयत्न झाला. पालदाड पुलाची त्या काळात निर्मिती झाली असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
देवकान्हेमध्ये विकासकामांचे लोकार्पण
रोह्यातील देवकान्हे येथील विविध विकासकामांचा प्रारंभ खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. देवकान्हे गावातील अंगणवाडी नवीन इमारतीचे उद्घाटन, नवीन नळपाणी योजनेचे भूमीपूजन, शंकर मंदिराचे भूमीपूजन, ग्रामीण रुग्णालय सबसेंटरचे भूमीपूजन करण्यात आले. गावासमोर असलेल्या काळव्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याने पाटबंधारे विभागाशी चर्चा करून लवकरच प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खा. सुनिल तटकरे यांनी दिले.