येरळमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

| सुतारवाडी | वार्ताहर |

केंद्र शाळा येरळ येथे मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जान्हवी मोरे, हरिश्चंद्र कुर्ले यांच्या संकल्पनेतून माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात रामचंद्र पवार, नारायण म्हामणकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आली. यावेळी विष्णू मोरे, बाळकृष्ण आयरे संजय आयरे, नामदेव शिंदे, रामचंद्र मोरे, वसंत जाधव, गोपीचंद जाधव, नामदेव शिंदे, संतोष शिंदे, आनंद जाधव, विलास कदम, गणेश मोरे, जगन्नाथ मोरे, गोरख जाधव, संजय आयरे, सिताराम शिंदे, रवींद्र मोरे, दत्ताराम मोरे, प्रसन्न मोरे, पियुष वाघमारे, सोहम मोरे, समीर जाधव उपस्थित होते.


Exit mobile version