अमरनाथ यात्रा पुन्हा मार्गस्थ

। जम्मू । वृत्तसंस्था ।
काश्मीर खोर्‍यातील खराब वातावरणामुळे स्थगित झालेली अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली असल्याची माहिती स्थानिक अधिकार्‍यांनी दिली आहे. खराब वातावरणामुळे बालटाल आणि पहेलगाम हे दोन्ही मार्ग यात्रेकरूंसाठी बंद करण्यात आले होते. 43 दिवस चालणारी ही यात्रा 30 जून रोजी सुरू झाली होती. करोनामुळे गेली दोन वर्ष ही यात्रा बंद करण्यात आली होती. मात्र, यंदा सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी 65 हजारांच्यावर भाविक अमरनाथ यात्रेत सहभागी झाले आहेत.

Exit mobile version