अंबाबाईचा देखावा भाविकांचे श्रद्धास्थान

। उरण । वार्ताहर ।
ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावामधील शिवसेनाप्रणित सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ मागील 32 वर्षांपासून नवरात्रोत्सव साजरा करत आहे. यंदाचे 33 वे उत्सव वर्ष असून, या मंडळांनी ‘आदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आई’ या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचा सुरेख देखावा साकारला आहे. सध्या हा देखावा भाविकांचे श्रध्दास्थान बनला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना एकत्र यावे व आपल्या विचारांची देवाणघेवाण करावी तसेच विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम राबविण्यात यावे यासाठी 30 वर्षांपूर्वी अभिनव मित्र सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ मधीलपाडा- तेलीपाडा व शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ चिरनेर-रांजणपाडा या दोन नवरात्रोत्सवाची स्थापना केली.

चिरनेर गावात मोठ्या भक्तिभावाने, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात येत असलेल्या नवरात्रौत्सवा निमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमांसह विविध जातींच्या लोकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचा, तर अभिनव मित्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज व श्री समर्थ रामदास स्वामी यांचा देखावा साकारुन दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. याही वर्षी दोन्ही मंडळाच्या वतीने रास गरबाबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

Exit mobile version