। खारेपाट । वार्ताहर ।
मांडवखार येथील सामाजिक कार्यकर्ते संजय मोकल यांचे वडील अंबाजी काशिनाथ मोकल यांचे पनवेल येथे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 94 होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ते नोकरीस होते. मांडवखार येथील राधाविलास भजन मंडळात निवृत्तीनंतर ते सक्रीय होते. त्यांच्या अंतयात्रेला राजकीय, सामाजिक व समाजाच्या सर्व थरांतील नागरीक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी ताराबाई, संजय व संदेश ही दोन मुले, दोन बहिणी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दिवसकार्य रविवार दि.28 रोजी होणार आहे.