| नेरळ | वार्ताहर |
देशातील पहिले कृषी पर्यटन केंद्र असलेल्या आणि शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रात जगभरातील अनेक शास्त्रज्ञ हे अभ्यास दौऱ्यावर येत असतात. बुधवारी(दि. 17) इस्रायल देशाचे भारतातील वाणिज्य राजदूत कोबो शोषानी यांनी आपल्या देशातील अधिकारी वर्गासह सगुणाबाग येथे पोहचले. सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रावर पोहचताच महाराष्ट्र्र शासनाचा कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांनी स्वागत केले. एसआरटी शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी इस्रायल देशाचे भारतातील राजदूत आणि अन्य अधिकारी यांना घेऊन भुईमूग शेतीच्या शेतात उतरून पाहणी केली. त्यावेळी कृषी भूषण आणि कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांनी शेतीमध्ये मजुरांचे काम कमी करणारे हे शेती तंत्र असून महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गुजरात एसआरटी पद्धतीने शेती करीत असल्याची माहिती दिली.