अंबाती रायडूची विराट कोहलीवर टीका

| अहमदाबाद | वृत्‍तसंस्था |

आयपीएलची ट्रॉफी आक्रमकपणा आणि विजयाच्या जल्लोषाने जिंकता येत नसते, तसेच चेन्नईला हरवले म्हणून आयपीएल विजेता होता येत नाही, त्यासाठी प्ले-ऑफमध्ये चांगला खेळ करावा लागतो, अशा तिखट शब्दांत अंबाती रायडूने अप्रत्यक्षपणे विराट कोहलीला सुनावले. अंबाती रायडू हा चेन्नई संघाचा खेळाडू गतवर्षी आयपीएल वितेजेपदानंतर निवृत्त झाला. महेंद्रसिंग धोनीने करंडक स्वीकारायला गतवर्षी रायडूला मंचावर बोलावले होते इतका त्याचा सन्मान राखण्यात आला होता, गेल्या शनिवारी बंगळूर संघाकडून झालेला पराभव आणि त्यानंतर विराट कोहलीचे अतिउत्साहातील सेलिब्रेशन रायडूला पचनी पडले नव्हते. शुक्रवारी बंगळूरचा राजस्थान संघाकडून पराभव झाल्यानंतर रायडूच्याही भावनांचा उद्रेक झाला. शनिवारच्या सामन्यात बंगळूरचा चेन्नईवर विजय एवढीच घटना त्यात घडली नव्हती.

सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि त्याचा बंगळूर संघ विजयाच्या जल्लोषात मश्गुल झाला होता. खेळाडूंच्या हस्तांदोलनासाठी धोनी आपली टीम घेऊन आला, तो सर्वात पुढे होता; परंतु बंगळूरचे खेळाडू जल्लेषातच मग्न होते, परिणामी धोनी कोणाशीही हस्तांदोलन न करता माघारी फिरला होता. आता समालोचन करत असलेल्या रायडूच्या नजतेतून हा प्रसंग सुटला नव्हता, म्हणूनच काल बुधवारी बंगळूरचा संघ पराभूत झाल्यानंतर त्याने प्रामुख्याने विराट कोहलीवर निशाणा साधला..आम्ही अपेक्षेपेक्षा कमी धावा केल्या, अशी कबुली बंगळूरचा कर्णधार फाफ डुप्लेसीने सामन्यानंतर दिली. तसेच पराभवास इतरही काही बाबी महत्त्वाच्या ठरल्या. आमच्याकडून झालेल्या काही चुकांचा फायदा राजस्थानला धावांचा पाठलाग करताना मिळाला. तरीही बंगळूर संघाचा मला अभिमान आहे, असे डुप्लेसीने सांगितले..रात्रीच्या वेळी अधिक प्रमाणात दव पडणार असल्याने आम्हाला आणखी 20 धावा करायला हव्या होत्या. दव आणि इम्पॅक्ट खेळाडू असे घटक मारक ठरले. हेटमायर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आला आणि त्याने केलेली फटकेबाजी आम्हाला विजयापासून दूर नेणारी ठरली, असे डुप्लेसी म्हणाला.

Exit mobile version