अंबोली धरण भरले तुडूंब


परिसरातील गावांना सर्तकतेचा इशारा
पर्यटकांना सक्त मनाई
। मुरूड/जंजिरा । वार्ताहर ।

हेटवणे मध्यम प्रकल्प उपविभाग, पेण या विभागाच्या अधिपत्याखालील मुरुड तालुक्यातील अंबोली लघु पाटबंधारे योजना प्रकल्प असुन सदर अंबोली धरण पुर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून विसर्ग सुरु झाला आहे. तरी या धरण क्षेत्रातील गोयगान, उंडरगाव, बौद्धवाडी, जोसरांजण, वाणदे, शिघ्रे, छोटी अंबोली, खार आंबोली व तेलवडे या नदीकाठच्या ग्रामपंचायतींच्या सरपंचाना सर्तकतेचा इशारा हेटवणे मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता अ.द.रोकडे यांनी दिला आहे.

आंबोली धरण मुरुड पासुन 6 कि.मी. वर असुन या मातीच्या धरणाची लांबी 518 मीटर, उंची 32.09 मीटर, एकूण पाणीसाठा क्षमता 9.96 दशलक्ष घन मीटर आहे. मुरूड शहरासाठी 0.849 दशलक्ष घनमीटर तर लगतच्या गावांना 616 हेक्टरमध्ये सिंचन क्षेत्र अपेक्षित असुन सिंचनाकरीता 9.11 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती देण्यात आली आहे. या महिन्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक धरणावर येतात पण कोरोनामुळे पोलिसांनी पर्यटकांना येण्यास सक्त मनाई केली आहे.

Exit mobile version