अमेरीकेने रचला इतिहास

पाकिस्तानला दाखवला बाहेर रस्ता

| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |

यंदाच्या टी-20 विश्वचषकात मोठ मोठे फेर बदल होताना पहायला मिळाले आहे. ज्यामध्ये पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसाला आहे, कारण चालू विश्वचषकातून पाकिस्तान बाहेर पडला आहे. पाकिस्तान आपल्या पहिल्या दोन सामन्यात भारत आणि अमेरिकेविरुद्ध पराभव झाला आहे. यजमान अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला मात दिला होता. तर भारतीय संघाने पाकिस्तानचा 6 धावांनी लाजिरवाणा पराभव केला होता. त्यानंतर पाकिस्तान पुनरागमन करत तिसऱ्या सामन्यात कॅनडा विरुद्ध विजय मिळवला होता.

यजमान अमेरिका संघाने विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी केली, ज्याचा फटका पाकिस्तानला बसला. अमेरिकेने आपल्या पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता आणि भारतासमोर त्यांचा पराभव झाला. मात्र, संघाकडे 4 गूण प्राप्त होत्या आणि साखळी फेरीतील शेवटचा सामना आयर्लंड विरुद्ध होणार होता. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला. त्याचाच फायदा अमेरिकेला मिळाला. सामना रद्द झाल्याने संघास 1 गूण देण्यात आले. ज्या जोरावर संघाकडे एकूण 5 गूण झाल्याने सुपर-8 साठी अमेरिका पात्र ठरला. दुसरीकडे पाकिस्तान संघ तीन पैकी एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ 2 गूण आहेत. पुढच्या सामन्यात पाकिस्तान जिंकले तरी त्यांच्याकडे 4 गूण होतील जे सुपर-8 साठी पात्र ठरण्यास पुरेसे नाहीत.

पाकिस्तानच्या संघानं विश्वचषकात खराब कामगिरी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही या संघाने विश्वचषकात चाहत्यांना निराश केले आहे. संघाचा कर्णधार बाबर आझमबद्दल बोलायचे झाले तर, त्याने अनेकदा मोक्याच्या क्षणी कच खाल्ली आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये प्रचंड नाट्य घडले होते. याचे परिणाम संघाला भोगावे लागले.

पाकिस्तानचा संघ 2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातून गृप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. यानंतर बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि शाहीन आफ्रिदीकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. या दरम्यान निवडकर्ते आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही बदलण्यात आले. मात्र, या टी-20 विश्वचषकापूर्वी शाहीनला कर्णधारपदावरून हटवून पुन्हा बाबरकडे जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, त्याच्या नेतृत्वात संघ सुपर-8 मध्येही पोहोचू शकला नाही.

बाबर आझमच्या नेतृत्वावर दिकास्त्र
बाबर आझमच्या नेतृत्व आणि संघाच्या कामगिरीवर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूंनी सूनावले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत संघातील बाबर आझम तसेच खेळाडूंवर प्रतिक्रिया दिली आहेत. यावेळी वसीम आक्रम म्हणाले, अमेरिका सुपर-8 साठी पात्र ठरण्यात यशस्वी ठरले आहे. त्यांनी उत्कृष्ट खेळ दाखवला आहे आणि हा संघ सुपर-8 मध्ये जाण्यास पात्र आहे. आता पाकिस्तानची काय योजना आहे, आता त्यांना यूकेची फ्लाइट पकडावी लागेल. यूके आणि नंतर घरी जा अश्या शब्दात वसीम आक्रमने राग व्यक्त केले आहे. याच दरम्यान, शोएब अख्तरने लिहिले, पाकिस्तानचा विश्वचषक प्रवास संपला.
कुर्बानी के जानवर हाजिर हो
संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिजनेही या खेळाडूंचा समाचार घेतला आहे. त्याने पाकिस्तान क्रिकेट हॅशटॅगसह आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'कुर्बानी के जानवर हाजिर हो', असे म्हणत खडसावले आहे. पोस्ट शेअर करताना शहजादने लिहिले की, योग्य संघ सुपर-8 फेरीत पोहोचला आहे. जर तुम्ही कोणालाही हरवण्यासाठी आयर्लंडवर अवलंबून असाल, तर तुम्ही पात्र ठरण्यास पात्र नाही. असा विचार करू नका की, 'कुदरत का निजाम' देखील यासाठी काम करतो. जे पात्र नाहीत किंवा सुधारण्यास इच्छुक नाहीत त्यांच्याकडे आता सर्वांच्या नजरा पीसीबीच्या अध्यक्षांवर आहेत.
Exit mobile version