अमेय, साईराज महाराष्ट्रच्या संभाव्य क्रिकेट संघांत

| रायगड | प्रतिनिधी |
रायगडच्या अमेय पाटील व साईराज जोशी यांची 16 वर्षांखालील महाराष्ट्रच्या संभाव्य क्रिकेट संघांत निवड करण्यात आली आहे, अशी महिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या 16 वर्षाखालील मुलांच्या निमंत्रीत संघांच्या स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या संघातून खेळताना अमेय पाटील व साईराज जोशी यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांची महाराष्ट्राचा संभाव्य संघात निवडण्यात आली.

महाराष्ट्राचा संभाव्य संघाचे सराव शिबीर सुरु आहे. यातून विजय मर्चंट करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 15 खेळाडूंचा अंतिम संघ निवडण्यात येणार आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते तसेच रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.

Exit mobile version