। पनवेल । वार्ताहर ।
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी गृहमंत्री अमित शहा यांच्या बेताल वक्तव्याचा पनवेलमध्ये महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांचा पनवेलमध्ये मविआकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. यावेळी शेकापचे मा.आ.बाळाराम पाटील, पनवेल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, नरेेंद्र गायकवाड, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, संतोष गोळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, काशिनाथ पाटील, गणेश कडू, शंकर म्हात्रे, निर्मला म्हात्रे, नरेंद्र गायकवाड, अनिल ढवळे, बबन गोगावले, गणेश खांडगे, संगीता राऊत, शशिकांत बांदोडकर, पराग मोहिते, राज सदावर्ते, राकेश जाधव, सुभाष गायकवाड, शशिकांत वाघमारे आदींसह मोठ्या प्रमाणात मविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.