| खोपोली | प्रतिनिधी |
स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका तोंडावर असताना सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या मोर्चे बांधणीला तयारी सुरु झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेही अॅक्टिव्ह मोडमध्ये आले असून, अमित ठाकरे कोकण दौर्यावर आले असताना दि.10 जुलै रोजी त्यांचे खालापूर तालुक्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांची जाहीर सभा लायन्स क्लब हॉलमध्ये संपन्न झाल्याने मनसे कार्यकर्ते व महिला पदाधिकार्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यावेळीअमित ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, मी कोकणात विद्यार्थी संघटनेच्या बांधणीसाठी आलो असून, या दरम्यान मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करीत विद्यार्थी संघटनेची भक्कम बांधणी करणार आहे.
याप्रसंगी सरचिटणीस किर्ती कुमार, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव जे.पी.पाटील, मनसे नेते अभिषेक दर्गे, मनिष खवळे, खालापूर तालुकाध्यक्ष सचिन कर्णुक, खोपोली शहराध्यक्ष अनिल मिंडे, अभिजित घरत, बाळा दर्गे, अविनाश देशमुख, संजय तन्ना, मितेश शहा, संजय दळवी, सिध्देश घोडके, महेश पिंगळे, सचिन गुरसळ, नानू सावंत, संदीप पाटील, विनित मोडक, अभिजित मोरे, अतुल हाडप, सतिश येरुणकर, नितेश खाडे, आशिष चौधरी, निखिल गुरव, नितीन महाब्दी, दिपक कर्णुक, हरेश चंदने, पंढरी कर्णुक, संतोष हाडप, दत्तात्रेय मिरगळ, महेश रुठे, सतिश घोडविंदे, प्रविण साळुंखे, राजेश पारठे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा हेमाताई चिंबुळकर,शुभांगी हाडप,खोपोली शहर महिला अध्यक्षा मिनाक्षी आंबवणे, जयश्री मिंडे, मुदुला वराडकर, साक्षी गिरी, नेहा राणे, सुजाता जाधव, ज्योती मोरे, दया कोचरगे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.