| खोपोली | प्रतिनिधी |
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात एक निष्ठेन काम करीत पक्ष संघटना वाढीसाठी मेहनत घेणार्या अनिता पाटील यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उपजिल्हा संघटकपदी निवड केली आहे. अनिता पाटील यांचे निवडीचे वृत्त समजताच तालुक्यातील तमाम शिवसैनिक तसेच महिला शिवसैनिकांनी पाटील यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याचेच हे फळ आहे. कर्जत तालुक्यात युवती शिवसैनिक म्हणून संघटनेचे काम करीत असताना लग्नही खालापूर तालुक्यात झाले. त्यानंतर संघटनेच्या कामासाठी पती आणि सासरच्या मंडळींच्या पाठिंब्यावरच काम केले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत पक्षवाढीसाठी मेहनत घेईन, अशी प्रतिक्रिया अनिता पाटील यांनी व्यक्त केली.